नमस्कार सर, लग्नाला जवळपास पाच वर्षे झाली. मागील दोन-अडीच वर्षांपासून आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. खरं सांगायचं तर काही वैद्यकीय कारणांमुळे हे शक्य होत नव्हतं. पण म्हणतात ना, "डॉक्टर म्हणजे देवाचं रूप". तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे, मार्गदर्शनामुळे आणि आत्मविश्वासामुळे आज हे शक्य झालं आहे. आज आम्ही दोघं खूप आनंदात आहोत कारण आम्ही लवकरच आई-बाबा बनणार आहोत. ही खुशखबर साधारणपणे आई-वडिलांना सर्वात आधी सांगितली जाते, पण आज ती गोड बातमी आम्ही सर्वात आधी तुम्हाला सांगतो आहोत. खरंच, तुमच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच कमी पडतात. तुमच्या सहकार्याबद्दल, तुमच्या धीराबद्दल आणि तुमच्या सततच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थैंक्यू डॉक्टर साहेब